qr

Narayangad APK

या अँपमध्ये २३० वर्षांपूर्वीचा वैभवशाली इतिहास असलेल्या श्री क्षेत्र नारायणगड या

Version1.0 (1)
UpdatedApr 08, 2017 (4 years ago)
Developerश्री क्षेत्र नारायणगड संस्थान
CategoryApps, Social
IDcom.maibasoft.narayangad
Installs500+

या अँपमध्ये २३० वर्षांपूर्वीचा वैभवशाली इतिहास असलेल्या श्री क्षेत्र नारायणगड या संस्थानाच्या सामाजिक व धार्मिक कार्याची माहिती तसेच संस्थानाचा इतिहास,बांधकाम,सुरू असलेले वैद्यकीय उपक्रम,वारकरी शिक्षण संस्था, गोशाळा,अन्नदान यासारख्या उपक्रमाची सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे. गडावरील दैनंदिन उपक्रमाची तसेच चालू घडामोडीची माहिती भाविकांना या अँपद्वारे देत आहोत जेणेकरून जगभरातील भाविकांना याची माहिती प्रत्यक्ष घेता येईल.
श्री क्षेत्र संस्थान नारायण गड या संस्थानाची स्थापना श्री संत नारायण महाराज यांनी केली. हे तीर्थक्षेत्र बीडच्या वायव्य दिशेस असून ते बीडपासून २१ किलोमीटर अंतरावर आहे. त्याची समुद्रसपाटीपासून उंची अंदाजे ३५०० फुट आहे हे क्षेत्र ज्या डोंगरावर आहे. त्याची दक्षिणोत्तर लांबी सात किलोमीटर असून पूर्वपश्चिम रुंदी तीन किलोमीटर आह. या डोंगराचे विशेष वैशिष्ट्ये असे आहे कि हा डोंगर कोणत्याही दिशेने पाहिल्यास तो अर्धचंद्राकृती दिसतो.
श्री क्षेत्र संस्थान नारायण गडाच्या पूर्वेस केतुरां,बेलुरा,रुद्रापूर हि गावे आहेत.पश्चिमेस पौंडूळ आणि लिंबा हि गावे आहेत. दक्षिणेस औरंगपुर आणि हिवारसिंगा हि गावे आहेत. उत्तरेस साक्षाळपिंपरी हे गाव आहे.
डोंगराच्या मध्यभागी परंतु भूमिगत असा एक विस्तीर्ण तलाव आहे. तलावाकडे जाण्यासाठी पश्चिमे कडून एक भुयारी मार्ग आहे. तो खूप अरुंद व लहान असल्यामूळे एका वेंळी फक्त एकच माणूस बसून सरकत सरकत आत जाऊ शकतो. दुसरा मोठा मार्ग प्राचीन काळी उतरेकडून होता परंतू, डोंगराचा कडा कोसळल्यामुळे आज तो बंद आहे. आत तलावाच्या काठी सात सिध्द ॠषी तपश्चर्या करीत असत.
येथे स्वयंभू महादेव मंदिर, विठ्ठल रखुमाई मंदिर, नगद नारायण महाराज आणि संताच्या आठ समाध्या हि प्रमुख दैवते असून इतर हि उपदैवते आहेत. या गडाचे विशेषत्व असे आहे कि, या क्षेत्रात केलेले कोणतेही सत्कर्म असो व दुष्कर्म असो. ते ताबडतोब फलीभूत होते म्हणजे त्याचे फळ ताबडतोब विना विलंब मिळते म्हणूनच नारायण महाराजांना नगद नारायण महाराज म्हणतात .
हे संस्थान अतिशय जागृत आहे. येथील वातावरण फार पवित्र आणि शुध्द आहे संपूर्ण संस्थानाचे ४०० खन बांधकाम असून ते सर्व हेमाडपंती पद्धतीचे दगडी आहे. दरवाज्याशिवाय इतरत्र कोठेही लाकूड वापरलेले नाही त्यामुळे ते एखाद्या किल्याप्रमाणे मजबूत आणि प्रेक्षणीय आहे.
हे ठिकाण धाकटी पंढरी या नावाने देखील महाराष्ट्रात प्रसिध्द आहे.

What's New

First Release of Narayangad App.

Email: info@maibasoft.com

See more
See more