Wayam is a magazine app offering stories to listen to and content to read.
शालेय वयातील मुलांना ताज्या घडामोडी, दैनंदिन विज्ञान, ललित साहित्य, कलाकृती, प्रयोग, कोडी, उपयुक्त वेबसाइट, इत्यादी मजकूर वाचायला मिळावा आणि त्यांनी विचारप्रवण व्हावे, म्हणून हे मासिक सुरू केले आहे. विविध विषयांतील तज्ज्ञ ‘वयम्’मध्ये लिहितात. प्रत्येक महिन्याला एका ताज्या विषयाला बहुअंगाने भिडणारे लेखही यांत असतात. ‘वयम्’मधील बहुतांश मजकूर मराठीत असतो आणि एक-दोन लेख/गोष्टी इंग्रजीतून असतात. रंगीत टीव्ही बघणाऱ्या आणि संगणक वापरणाऱ्या पिढीतील मुलांना आकर्षक वाटावे आणि त्यांच्यावर उत्तम डिझाइनचा संस्कार व्हावा, यासाठी आवर्जून उत्तम प्रतीच्या कागदावर रंगीत छपाई केली जाते. ज्येष्ठ सुलेखनकार अच्युत पालव ‘वयम्’चे सुलेखन करतात. एकंदर निर्मिती- मूल्यांकडे लक्ष दिले जाते. 'वयम्' मासिकाच्या मुख्य संपादक शुभदा चौकर आहेत.
Read more
Advertisement
Advertisement